आयपीएल ट्वेंटी-ट्वेंटी आज भिडणार चेन्नई आणि बेंगलोर

0 37

दुबई – आयपीएलच्या १३व्या सत्रात आज विराट कोहली यांची रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि महेंद्रसिंग धोनी यांची चेन्नई सुपर किंग्स हे दोघी संघ आज दुबई क्रिकेट मैदानावर आमने-सामने असणार आहे.


हे सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. सध्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे तर चेन्नई सुपर किंग्स त्यांच्याखाली म्हणजे सहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सला आपल्या मागच्या सामन्यांमध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स पासून पराभव पत्करावा लागला होता. तर रॉयल चॅलेंजर बेंगलोरला सुद्धा डेली कॅपिटल पासून पराभव स्वीकारावा लागला होता.

या सत्रात सध्या चेन्नई सुपर किंग्स आपल्या ६ सामने पैकी चार मध्ये पराभूत झाले आहेत आणि फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर रॉयल चॅलेंजर बेंगलोर आपल्या पाच सामने पैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभूत झाले आहे.

Related Posts
1 of 49

आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे कारण आरसीबीचा टॉप ऑर्डर आणि चेन्नई सुपर किंग्स टॉपऑर्डर सध्या दोन्ही फॉर्ममध्ये येत आहे यामुळे सामना रोमांचक होण्याची शक्यता वाढली आहे.


आजची खेळपट्टी – दुबई क्रिकेट मैदानावर आतापर्यंत आयपीएलचे १० सामने खेळले गेले आहे त्यामध्ये डेली कॅपिटलचा १५७ धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना सर्वात कमी आहे. हा विकेट मध्यमगती गोलंदाज मदत करणारा आहे यामुळे या मैदानावर नाणेफेक जिंकून कर्णधाराला प्रथम गोलंदाजी करणे आवडेल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: