DNA मराठी

आयपीएलसाठी यूएई सज्ज

0 196

दुबई – जगभरातील क्रिकेट चाहते वाट पाहत असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात १९ सप्टेंबरला अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता गतविजेता मुंबई संघ आणि उपविजेता चेन्नई संघ यांच्यातील सामन्याने होणार आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोन दिवस आधी स्टेडियमचा दौरा करून तेथील पाहणी केली होती. आठ संघांदरम्यान खेळणाऱ्या सामन्यांचे आयोजन दुबई, अबुधाबी आणि शारदा येथे होणार आहे.

Related Posts
1 of 2,492


सुरुवातीच्या छप्पन सामन्यानंतर बाद फेरीचे सामने रंगणार आहेत. १० नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. यंदाची आयपीएल क्रिकेट शौकीनांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर आयपीएलची सुरुवात होणार आहे त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेल पोहोचली आहे. कोरोनामुळे यावेळीचे आयपीएल क्रिकेट प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: