आयपीएलच्या चौदाव्या सत्र सुरू होण्यापूर्वी सीएसकेने घेतला हा धाडसी निर्णय

0 28

नवी मुंबई– आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी लवकरच फेब्रुवारीमध्ये खेळाडूंचे लिलाव होण्याची शक्यता आहे.
यामुळे प्रत्येक संघ आपल्या आपल्या तयारी मध्ये व्यस्त झाला आहे. आयपीएलच्या चौदाव्या सत्रात मिनी ऑक्शन होणार आहे. बीसीसीआयने प्रत्येक संघाला २० जानेवारीपर्यंत रिटेन आणि रिलीज होणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यात सांगितले आहे.

२० जानेवारी पूर्वीच आयपीएलमधील सर्वात चर्चित संघ चेन्नई सुपर किंगने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या भारताचा स्टार फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंग त्याला संघातून रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या तेराव्या सत्रात फिरकीपटू हरभजन सिंग ने व्यक्तिगत कारण देत आयपीएलमधून माघार घेतली होती.
मागच्या सत्रात चेन्नई सुपर किंग्सला आपला अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग या निर्णयाच्या चांगलाच फटका बसला होता. चेन्नईला मागच्या वर्षी मध्ये आपला स्थान पक्का करण्यास सुद्धा अपयश आले होते.

चेन्नई सुपर किंग्स कडून आपल्याला या वर्षी रिलीज करण्यात आले आहे याबद्दलची माहिती स्वतः फिरकीपटू हरभजनसिंग यांनी दिली आहे. चेन्नई सुपर किंग्ससोबतचा माझा करार संपला आहे. या संघाकडून खेळण्याचा अनुभव चांगला होता. सुंदर क्षण आणि काही चांगले मित्र मला मिळाले. चेन्नई सुपर किंग्सचे व्यवस्थापन, स्टाफ आणि चाहते या सर्वांचे आभार. ऑल दी बेस्ट,”अशी भज्जीनं पोस्ट लिहीली आहे.

Related Posts
1 of 47

हरभजन सिंग २०१८ मध्ये मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग संघात दाखल झाला होता.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: