आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे रॅकेट उध्वस्त  

0 45

रायगड –  दुबई येथे सुरु असलेल्या  आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे एक मोठं रॅकेट रायगड पोलीसांनी उध्वस्त केले आहे. या प्रकरणी  ११ जणांना अटक कऱण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने ही कारवाई केली असून आरोपींना कर्जत, ठाणे आणि मुंबई परीसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

आयपीएलच्या सामाने सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात कुठे सट्टाबाजार सुरु आहे  याची तपासणी करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आणि अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी दिले होते. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने जिल्ह्यातील विवीध भागात शोध मोहिम राबवली होती  केली. यात कर्जत तालुक्यातील एका युनिवर्स रिसॉर्टमध्ये सट्टा लावला जात असल्याची माहिती पथकांला मिळाली. या माहितीची पडताळणी करून स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने पथकाने कर्जत येथील ००७ युनिवर्स रिसॉर्टवर धाड टाकली आणि या  सट्टा रॅकेटचा पर्दाफाश केला.

Related Posts
1 of 1,415


ही  टोळी आठ मोबाईल अँप्लिकेशनच्या मदतीने  सट्टा लावत होती. प्रत्येक सामन्यानंतर ठराविक पॉईंट्सच्या सट्टा लावणाऱ्यांना दिले जात होते. आठवड्यानंतर जमा झालेल्या पॉईंट्साठी सट्टा खेळणाऱ्यांना हवाला मार्फत रोख रक्कम दिली जात होती. या प्रकरणी पोलीसांनी आत्ता पर्यंत ११ जणांना अटक केली आहे. याच चार मुख्य सट्टेबाजांचाही समावेश आहे.

त्यांच्याकडून १७ मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. आणखी चार जणांचा शोध पोलीस करत आहे .स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाचे प्रमुख जे. ए. शेख, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक संदीप निकाळजे, पोलीस उप निरीक्षक अमित देशभुख यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: