आम्ही एकत्र येणार म्हणजे काय करणार?- देवेंद्र फडणवीस

0 22

पुणे –  एक जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघे परत एकदा पुणे येथे पूर्व पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भीमा आसखेड प्रकल्पाचे ऑनला‌‌ईन उद्घाटन कार्यक्रमाला एकत्र आले होते.

मात्र हे दोघे नेते परत एकदा एकत्र येणार याची चर्चा मागच्या तीन ते चार दिवसांपासून प्रसारमाध्यमात खूप जोराने होत होती.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चेवरून प्रसारमाध्यमांवर टीका केली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की एक तारखेला पवार-फडणवीस एकत्र येणार असल्याची उत्सुकता पुणेकरांपेक्षा मीडियालाच जास्त होती. आम्ही एकत्र येणार असल्याची एवढी चर्चा केली की मला कळेना, आम्ही एकत्र येणार म्हणजे काय करणार? आम्ही एकत्र येऊन कुस्ती करणार? की गाणं म्हणणार? असा प्रश्न त्यांनी प्रसारमाध्यमांवर टीका करताना उपस्थित केला आहे.

Related Posts
1 of 1,292

पुढे ते म्हणाले ते दादा आपण असे करू. एकतर तुम्ही मला चहाला बोलवा किंवा तुम्ही माझ्याकडे या. मग चालू द्या दोन-तीन दिवस बातम्या.

देवेंद्र फडणवीस नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा माध्यमांवर टीका केली आणि म्हणाले की मी ही दोन-तीन दिवस बघत होतो. सारखे तेच तेच नवीन बातम्या दाखवायला नाही मिळाल्या की या बातम्यांना जोर येतो.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: