आम्हाला गिनी पिग बनवू नका,मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला !

राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे म्हणजे नवीन नाही .आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे .राज्यातील कोरोना परिस्थिती, मुंबईची झालेली तुंबई यावरून संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
संदीप देशपांडेनी म्हटले आहे – सरकारडे ना कोरोनाचे नियोजन आहे ना मुंबईचे , दरवर्षी हीच गोष्ट घडते. आदित्य ठाकरेंनी यातून आम्ही शिकलो असं वक्तव्य केले होते . यावरून त्यांना टोमणा मारण्यात आलं आहे. तुम्हाला शिकायचंय म्हणून आम्हाला गिनी पिग बनवू नका असे म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोमणा मारला आहे .
परिस्थिती पाहता कोणतेच नियोजन दिसत नाही. सातत्याने लोकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार सुरू आहेत. यांची नालेसफाईदेखील कधी पूर्ण होत नाही. असे आरोपदेखील मनसेकडून करण्यात आले आहेत .