आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याची धमकी

0 72

मुंबई – मुंबईतील आमदार निवास बॉम्बने उडवून देऊ अशी काल रात्री धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.

रात्री पावणेबाराच्या दरम्यान हा निनावी फोन आला होता. यामुळे आमदार निवास तात्काळ रिकामे करण्यात आले आहे.मुंबईतील आकाशवाणी समोर असलेल्या आमदार निवासाला अज्ञात क्रमांकावरून बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली. याची खबर घेत  श्वानपथक, बॉम्ब स्क्वाड आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तात्काळ आमदार निवास रिकामे केले.

Related Posts
1 of 2,052

बॉम्ब शोधक पथकाने रात्रभर प्रत्येक मजल्यावरील रूम चेक केल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून आमदार निवासापासून ५० मीटरपर्यंत बॅरिकेट लावण्यात आले आहेत.

परंतु रात्रभर शोधाशोध केल्यानंतर कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू हाती लागली नाही  या मुळे हे निव्वळ कुणीतरी खोडसाळपणा केला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे.
याआदी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राज्याचे गृहमंत्री  अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सुद्धा अशा निनावी कॉल आला होता.त्या निनावी कॉल करणारे व्यक्तीची ओळख पटली होती आणि त्याला लगेच मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: