आपल्याकडे असेलल्या बाजार समितीला बंद पाळून दाखवावा -सुजय विखे

0 30

 अहमदनगर –  अहमदनगर मध्ये पत्रकारांशी बोलताना शहराचे खासदार सुजय विखे यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत  खुले आव्हान दिले आहे . सुजय विखे  म्हणाले  महाराष्ट्रासह बहुतांश राज्यातून या तीन कृषी कायद्यांना विरोध नाही.तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्या राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्याकडे असेलल्या बाजार समितीला बंद पाळून दाखवावा,’ असे थेट आव्हान भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ.  सुजय विखे यांनी म्हटले आहे.

हे पण पाहा- बोठेच्या संपर्कातील त्या व्यक्तींची झाली सखोल चौकशी

अहमदनगरचे खासदार सुजय विखे  पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि , ‘केंद्र सरकारने केलेले कायदे चांगलेच आहेत. जरी त्यात काही त्रुटी वाटत असतील तर त्यात दुरूस्ती करण्याची सरकारची तयारी आहे. यासंबंधी आंदोलनांसोबत आठ ते दहा वेळा चर्चा झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांचे एकमुखी नेतृत्व नाही. त्यामुळे त्यांना ही तडजोड मान्य होत नाही. मुळात हे आंदोलनच राजकीय प्रेरित असल्याने त्यांना तोडगा नकोच आहे, असेच दिसून येते. महाराष्ट्राच्या सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आंदोलनास पाठिंबा असल्याचे सांगतात. मात्र, ज्या दिवशी यासाठी बंद पाळण्यात आला, त्या दिवशी आपल्याकडील सर्व बाजार समित्या आणि शेतकऱ्यांचे व्यवहार सुरळीत होते. त्यांच्याच ताब्यातील बाजार समित्या ते बंद ठेवू शकत नाहीत. जर खरेच त्यांचा विरोध असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना सांगून असा कडकडीत बंद पाळून दाखवावा, असे माझे त्यांना आव्हान आहे. मात्र, हे त्यांना शक्य नाही. एका बाजूला फायद्यासाठी हे व्यवहार सुरळीत ठेवायचे आणि दुसरीकडे विरोध दाखवायचा, अशी दुटप्पी भूमिका या नेत्यांची आहे,’ असा आरोप खासदार सुजय विखे यांनी केला.

            या कारणाने बीसीसीआयने अजित आगरकरचा केला पत्ता कट   

Related Posts
1 of 1,301

डॉ . सुजय विखे पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले कि , ‘आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचा या आंदोलनाला पाठिंबा नाही. येथून जे शेतकरी पाठिंबा देण्यासाठी गेल्याचे सांगतात, तेही राजकीय नेत्यांच्या मदतीने गेलेले आहेत. सामान्य शेतकऱ्यांना या कायद्यातील तरतुदी आणि केंद्र सरकार घेत असलेले निर्णय पटत आहेत. कोणाच्या सांगण्यावरून ते भडकत नाहीत. कांद्याचा एवढा मोठा मुददा झाला होता, तरीही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली. कांद्याच्या बियाण्याची टंचाई निर्माण झाली होती, एवढा शेतकऱ्यांचा कांद्याकडे ओढा आहे. याचा अर्थ कांद्यासंबंधी केंद्र सरकारने घेतलेले धोरण त्यांना मान्य आहे आणि पुढील निर्णयांवर विश्वास आहे. आता मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. त्यामुळे पूर्वी घालण्यात आलेली निर्यात बंदी आता उठविण्यात येईल. यासाठी आपणच पुढाकार घेणार असून जानेवारीत ही बंदी मागे घेण्यासंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत.’

उस तोड मजुरांच्या मुलांना कधी मिळणार ऑनलाइन शिक्षण ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: