आपण महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहे की बिहारचे निवडणूक प्रभारी – जयंत पाटील 

1 44

मुंबई –  काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकाम बुधवारी बीएमसीने तोडला. महापालिकेच्या या कारवाईनंतर कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असा संघर्ष राज्यात पाहिला मिळत आहे. बीएमसीच्या या कारवाईवरून राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ठाकरे सरकारवर एका व्हिडिओ मधून टीका केली होती . टीका करताना फडणवीस यांनी हिंदीतून भाष्य केलं. त्यावर आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे

 हा विषय महाराष्ट्राचा प्रतिक्रिया हिंदीत? महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवं? असं जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं आहे.

Related Posts
1 of 1,357

व्हिडिओ मध्ये काये म्हंटले होते फडणवीस –  आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना आम्ही रस्त्यामध्ये थांबवून मारु. हे काम सरकारच्या समर्थनाने करु हे असं याआधी महाराष्ट्राच्या इतिहासात घडलं नाही. जे चूक आहे त्याला चूक म्हटलं पाहिजे. मात्र त्या गोष्टींने महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्र पोलिसांचा अपमान झाला आहे. महाराष्ट्राचा तेवढाच अपमान देशभरामध्ये सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्यामुळे होत आहे. बेकायदेशीर बांधकाम असेल तर बांधकामावर कारवाई केलीच पाहिजे. मात्र सर्वांविरोधात ही कारवाई झाली असती तर योग्य कारवाई असती. कोणीतरी आपल्याविरोधात बोललं म्हणून आपण कारवाई करत असू तर हा भित्रेपणा आहे ,असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Show Comments (1)
error: Content is protected !!
%d bloggers like this: