आपटीचे माजी सरपंच आणि भाजप युवा मोर्चाचे कायम निमंत्रित सदस्य नंदू गोरे एमपीडीए कायद्या नुसार एक वर्षांसाठी स्थानबद्ध

0 54

जामखेड – आपटी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि भाजप युवा मोर्चाचे कायम निमंत्रित सदस्य नंदू प्रकाश गोरे (वय ३१ )यास धोकादायक व्यक्ती म्हणून त्याच्यावर जामखेड पोलिस स्टेशनला पाच वर्षांत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला मोका कायद्यान्वये अटक करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्य़ातील धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर, अवैध धंदे, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती, कुविख्यात गुन्हेगार यांच्या विरूद्ध कडक कारवाई करण्याचे संकेत तत्कालीन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत.

त्याअनुषंगाने जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी जामखेड येथील धोकादायक व्यक्ती म्हणून तालुक्यातील आपटी येथील नंदू गोरे याच्यावर सन २०१५ ते २०२० या कालावधीमध्ये जामखेड पोलिस स्टेशनला मारामारी, आर्म अॅक्ट, धमकावणे, असे विविध प्रकारचे सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्यावर एमपीडीए ( Maharashtra Preventive Dangerous Activities )कारद्यानुसार कारवाई करावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पाठवला होता त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अंतिम निर्णय घेऊन धोकादायक व्यक्ती म्हणून नंदू गोरे यास ८ आँक्टोबर रोजी एक वर्षाकरीता स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले आहे.

Related Posts
1 of 1,402

पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, यांच्या संयुक्त पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, गुन्हे शाखेचे फौजदार मधुकर शिंदे, भाऊसाहेब कुरूंद, किरण जाधव, सचिन राठोड यांनी धडक कारवाई करून नंदू गोरे यास मोका कायद्यान्वये अटक करून नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात एक वर्षांसाठी स्थानबद्ध केले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: