आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात-प्रमोद काळे

0 27

  श्रीगोंदा – महाराष्ट्र राज्यातील आदिवासी पारधी समाज आजही मोठ्या प्रमाणात दारिद्रय रेषेखाली असुन आरोग्य,शिक्षण,रोजगार,निवारा याचबरोबर उपजीविकेचे कोणतेही शाश्वत साधन उपलब्ध नसल्यामुळे हा समाज आजही मोठ्या प्रमाणात हालाखीची जीवन जगत आहे त्यामुळे शासनाने आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात व येणाऱ्या अर्थसंकल्पात आदिवासी पारधी समाजासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन आदिवासी विकास विभाग नाशिक मुख्यालयाचे आयुक्त यांना दिले असल्याचे आदिवासी पारधी परिषदेचे राज्य समन्वयक प्रमोद काळे यांनी सांगितले.

          हे पण पहा – अखेर हटवला देहविक्रीचा अड्डा

पारधी म्हणल की गुन्हेगारीचा शिक्का असलेली जमात हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते मात्र या समाजातील मोठा घटक खासकरून सुशिक्षित तरुण हा शिक्का पुसुन विकासाच्या वाटा शोधताना दिसत आहेत.भारतीय राज्यघटनेत आपण कल्याणकारी राज्याची संकल्पना स्विकारली असुनही आजही पारधी समाजापर्यंत शासकीय योजना तसेच योजनांची माहिती मिळत नाही आणि  विकासाच्या एकविसाव्या शतकातही पुरोगामी महाराष्ट्रात समाजाची ही स्थिती असणे त्यांना विकासाच्या संधी न मिळणे हे अत्यंत दुर्दैवी असुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात यावा,श्रीगोंदा तालुक्यातील औटेवाडी  येथील आदिवासी प्रकल्प कार्यालय राजुर यांनी अधिग्रहीत केलेल्या सात एकर जागेवर सेमी इंग्रजी निवासी शाळा विशेष बाब म्हणुन मंजूर करावी,आदिवासी पारधी समाजासाठी व्यवसाय प्रशिक्षण सुरू करावे, निवासी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक केंद्र सुरू करावे,आदिवासी पारधी समाजातील लोक घरकुल मंजुर होऊनही जागेअभावी त्याचा लाभ घेता येत  नसल्यामुळे गायरान, गावठाण व वनजमीनीवर घरकुल बांधकामाची मंजुरी मिळावी.युवक युवतींसाठी विना अट व्यावसाय कर्ज उपलब्ध करून द्यावे,जातीचे दाखले व रेशनकार्ड वितरणासंबंधी महसूल विभागाला आदेश करावेत, भूमिहीन कुटुंबांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी व शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात यावे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा,कर्जत जामखेड तालुक्यासाठी स्वतंत्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात यावे या मागण्यांचा समावेश आहे.

      नववर्ष अतिशय शांतपणे आणि साधेपणाने साजरा करा – अनिल देशमुख 

Related Posts
1 of 1,292

यावेळी आदिवासी विकास विभाग नाशिक मुख्यालयाचे अपर आयुक्त विकास पानसरे व पारधी विकास विभागाच्या श्रीमती दाभाडे यांच्याशी चर्चा केली असता आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून प्रयत्न आहेत त्याचबरोबर या योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी योजनांची माहिती पुस्तिका थेट ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

 राज्यात नव्या कोरोना स्ट्रेनचा एकही रूग्ण नाही – राजेश टोपे 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: