आत्महत्यांचे सत्र सुरूच.. सुशांत नंतर आता ‘या’ अभिनेत्याने केली आत्महत्या

0 14

सुशांत सिंग पाठोपाठ आणखी एका अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडली. या घटनेने बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांमध्ये एकच खळबळ उडाली.अभिनेता समीर शर्माचा त्याच्या राहत्या घरी मृत्यू झाला आहे. पोलिसांना आत्महत्येचा संशय आहे. मालाड येथील घरी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. समीरने ‘कहानी घर घर की’ सह बऱ्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले. समीर शर्मा गेल्या काही दिवसांपासून कोणालाच भेटला नसल्याचे पोलिसांच्या तापसांत समोर आले. मालाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ इन्स्पेक्टर जॉर्ज फर्नांडिस यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले की, ‘आम्हाला त्याच्या घरी कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. प्रथमदर्शनी तरीही ही आत्महत्या वाटत आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने गळफास लावून घेतल्याचे दिसते. ऍटोप्सीसाठी त्याचा मृतदेह पाठवला आहे. त्या अहवालानंतरच यावर अधिक बोलता येऊ शकतं.” जेव्हा त्याच्या घरातून दुर्गंध येऊ लागला तेव्हा सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी जेव्हा घर उघडलं तेव्हा समीरचा मृतदेह आढळला. अशी चर्चा आहे की, दोन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. शरीरातून दुर्गंध यायला सुरुवात झाल्यानंतर त्याच्या शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना बोलावले.

Related Posts
1 of 1,359
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: