DNA मराठी

आता सुटी सिगारेट आणि बिडी विकायला महाराष्ट्रात बंदी

0 198

मुंबई- महाराष्ट्रात करोनाचा पसार वेगाने होत आहे . या मुळे आरोग्य विभागाने आता कोणत्याही पान बिडी दुकानात राज्यात कुठेही सुटी सिगारेट आणि बिडी विकायला बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश आरोग्य विभागाने जारी केला असून पोलीस आणि महापालिका यांनी या आदेशाची तातडीने आणि कठोरपणे अमलबजावणी करावी अशी अपेक्षा आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात सध्या शाळा, कॉलेजमधील तरूण पिढी मोठया प्रमाणात सिगारेट पासून गुटख्याच्या अहारी गेले आहे. आरोग्य विभागाने यापूर्वी सुट्टी सिगारेट आणि बिडीची विक्री होऊ नये यासाठी विधी आणि कायदा विभागासह सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. परंतू विधी विभागाकडून पुरेसे पाठबळ न मिळाल्याने आरोग्य विभागाला याबाबत आदेश काढता आला नव्हता, असे आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Related Posts
1 of 2,510

अनेक राज्यांनी सुटी सिगारेट आणि बिडीच्या विक्रीला याच मुद्द्यावर बंदी घातली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे हेही महाराष्ट्रात असा आदेश आरोग्य विभागाकडून निघावा यासाठी आग्रही होते. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी हा आदेश जारी करताना सर्व कायदेशीर बाजू तपासून पाहिल्या तसेच हा आदेश काढताना एपिडेमिक अॅक्ट १८९७, इंडियन पिनल कोड १८६०, मुंबई पोलीस अॅक्ट १९५१, क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३, नॅशनल डिझास्टर अॅक्ट २००५ आणि केंद्राचा कायदा संदर्भित केला आहे.


२४ सप्टेंबररो जी महाराष्ट्रातील कोणत्याही पान-बिडी शॉप अथवा कोणत्याही दुकाने आणि आस्थापनांमध्ये यापुढे सुटी सिगारेट बिडी विकता येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.यामुळे यापुढे सिगारेट वा बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट वा बिडी बंडल विकत घ्यावे लागणार असून प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात व्यसनांकडे वळलेल्या तरुण पिढीला रोखण्यासाठीच हा आदेश काढल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले. कॉलेजमधील तरुणच नव्हे तर तरुण मुलीही अगदी सहजपणे सिगारेट ओढताना दिसतात. तरुण पिढीला नशेपासून दूर ठेवण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ती सर्व पावले आरोग्य विभाग उचलेल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: