आता या अभिनेत्यालादेखील ड्रग्स प्रकरणात अटक !

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे . सुशांतची हत्या की आत्महत्या हे शोधात असताना CBI ला ड्रग्स अँगल सापडला. ड्रग्स प्रकरणी रिया चक्रवर्तीसह अनेक मंडळी NCB च्या रडारवर आहे.चौकशीदरम्यान रियाने अनेक दिग्गज लोकांची नवे घेतली आहेत. एनसीबीने विविध ठिकाणी छापे टाकून कारवाईला सुरवातदेखील केली आहे. या कारवाईत आता बॉलिवूड अभिनेता किशोर शेट्टीला अटक झाली आहे.
किशोर शेट्टी फेमस डान्सर आहे. डान्स इंडिया डान्स या रियालिटी शो मुळे तो प्रकाशझोतात आला.एबीसीडी सिनेमामध्येदेखील तो झळकला होता.केवळ किशोर शेट्टीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नवे समोर आली आहेत. नक्कीच तपासात आता बडे चेहरे या अँगेल मध्ये सापडतील यात शंकाच नाही . क्राईम ब्रांचला किशोरशेट्टीजवळ डायरेक्ट ड्रग्स सापडले त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.
सध्या अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती,शोविक चक्रवर्ती , अब्दुल बसित ,झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांना जामीन मिळाला नाही. तसेच रियाला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.