आता ऑनलाईन शाळेचेही ॲप ; १२००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार – आ रोहित पवार


जामखेड : कोरोनामुळे सगळंच ऑनलाईन झालाय आणि यापासून विद्यार्थी काही सुटलेले नाहीत . ऑनलाईन शाळा चालूच आहेत यातही जामखेडमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघाच्या वतीनं ऑनलाईन शाळेच्या अँप चं उदघाटन आ रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झालं . आज खरंच या अँप ची गरज असून शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या मदतीने हे ॲप तयार केलेले असून १४०० शिक्षकांना ट्रेनिंग दिलाय त्यामध्ये ते ॲप कसा आहे त्याचा वापर कसा करायचा हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे .आत्तापर्यंत ६००० विद्यार्थ्यांपर्यंत हे ॲप पोहोचले आहे तसेच रयतेची मदत घेऊन बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत हे ॲप पोहोचवायचा आहे अशी माहिती आ रोहित पवार यांनी दिली