आता एनसीबी करणार बॉलिवूडची तपास हे आहे कारण……..

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपासाला वेगळं वळण येत असून. सीबीआयने ही हत्या नसून आत्महत्या असल्याचा निकर्ष काढला परंतु ईडी आणि एनसीबी या तपासयंत्रणा त्याच्या मृत्यूचं कारण शोधण्याच्या प्रयत्नात आहे. एनसीबीनं कारवाई करत सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग कनेक्शन प्रकरणात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली असून. रियानं एनसीबीच्या चौकशीत भयानक आणि धक्कादायक गोष्टींचा खुलासा तिने केलाय, बॉलिवूडमधील ८५ टक्के कलाकार ड्रग्जचं सेवन करत असल्याची माहिती तिने चौकशीत सांगितली आहे, त्यामुळे आता मोठया सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर आले आहेत.
रियाने चौकशी मध्ये सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि डिझायनर सिमोन खंबाट्टा यांचे नाव घेतले आहे या मुळे एनसीबी ड्रग्स प्रकरणात त्याना सामन पाठवणार आहे. रियानं बॉलिवूडमधील ड्रग्ज केनक्शन उघड करताना तिने अनेकांची नाव तपासात घेतल्यानं खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या अहवालांचा असा दावा आहे की रियाने ड्रगच्या प्रकरणात २५ बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे उघडकीस आणली आहेत. या यादीमध्ये ए-लिस्ट अॅक्टर्स, डायरेक्टर, कास्टिंग डायरेक्टर, निर्माते आणि डिझाइनर्स या नावांचा समावेश आहे. अहवालात असेही सुचवले आहे की मादक पदार्थ नियंत्रण नियंत्रण ब्युरो (एनसीबी) लवकरच वरील सेलिब्रिटींसह २५ सेलिब्रिटींना समन्स बजावेल.
केंद्रीय चौकशी समिती आता ए, बी आणि सी स्तरावरील विविध स्तरातील सेलिब्रिटींची चौकशी करण्यावर लक्ष केंद्रित करीत असतानाही, त्याची तपासणी करणारी संस्था, ड्रग पेडलर, अनुज केशवानी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मुंबई आणि गोव्यातील विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.एनसीबीने रिया आणि तिचा भाऊ शोिक चक्रवर्ती यांना नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत अटक केली होती. सत्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे.