आता अशीही आंदोलने ; आम आदमी पक्षाची कामगिरी


अहमदनगर : श्रीरामपूर शहरात रस्त्यांची दुरावस्था झालेली पाहून प्रशासनाला जाग येत नाही हे पाहून आम आदमी पक्षाच्या वतीनं सोमवारी सेल्फी विथ खड्डे आंदोलन करण्यात आले . श्रीरामपूरची रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झलेली असून रस्ते उखडलेले आहेत . मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यात पावसाचे पाणी साठते आणि अपघात घडत आहेत . याआधीही अनेक आंदोलने करण्यात आली , पण प्रशासनाला जाग आली नाही . सेल्फी विथ खड्डे या आंदोलनामुळे तरी प्रशासनाला जाग येईल असं गृहीत धरून हे आंदोलन करण्यात आले .