
कोरोनामहामारीमुळे सर्व जग हळूहळू पूर्वपदावर येत आहे . जरी जनजीवन सुरळीत होत असले तरी कोरोनाचा धोका अजून टळला नाही तसेच अजूनही अनेक गोष्टींवर बंधने आहेत. त्यातीलच एक सेवा म्हणजे मुंबईची लोकल .कोरोनामुळे मुंबईची लोकल सेवा काही महिने बंद होती आता फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी हि सेवा सुरु आहे . अशा परिस्थितीमुळे ,मुंबईच्या डब्बेवाल्यांची सेवा सध्या बंद आहे.याच पार्श्वभूमीवर डब्बेवाल्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी राज ठाकरेंनी डब्बेवाल्यांना चांगलेच सुनावले.
या डब्बेवाल्यांची शिवसेनेशी जवळीकी आहे.मात्र सेवाच बंद असल्याने घर चालवायचे असे कित्येक प्रश घेऊन ते गेले राज ठाकरेंकडे. राज यांची भेट घेऊन त्यांनी आपली व्यथा त्यांना सांगितली .तसेच लोकल सेवा सुरु असणाऱ्यां कर्मचाऱ्यांबरोबरच आपल्यालाही प्रवासाची परवानगी मिळावी अशी मागणी त्यांनी केली .
डबेवाल्यांनी सांगितले की ,सत्तेवर आल्यानंतर सगळे प्रश्म मार्गी लावू असं उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले होते .हे सर्व ऐकून राज ठाकरेंनी त्यांचे सगळे प्रश्न ऐकले आणि मार्ग काढण्याचं आश्वासही दिले. मात्र पुढे ते म्हणाले सत्ता त्यांच्या हातात द्या, आणि प्रश्नांसाठी माझ्याकडे या !