आणखी एक अभिनेत्रीची आत्महत्या  

0 24

हैदराबाद-  २०२० हे वर्ष चित्रपठसुष्टी साठी अतिशय धक्कादायक दिसू येत आहे. यावर्षी अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. कोणी आजारपणामुळे सोडून गेले  तर कुणी आत्महत्या करून आपले जीवन संपवलं आहे . सुशांतच्या आत्महत्येचा धक्का अजून कलाकार आणि त्याच्या चाहते पचवू शकले नसतानाच आणखी एका कलाकाराने आत्महत्या केली आहे. तेलुगु चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री श्रावणी हीने वय (२६) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ८ सप्टेंबर रोजी अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांच निधन झालं. या घटनेतून चाहते सावरत नाही तोच त्यांच्या मनावर श्रावणीच्या आत्महत्येचा आघात झाला. 

अद्याप श्रावणीच्या आत्महत्येचं कारण समजले नाही. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरूकेली आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी असा आरोप केला आहे की, देवराज रेड्डी नावाच्या एका व्यक्तीमुळे श्रावणीने एवढं मोठा पाऊल उचलला. देवराज हा श्रावणीचा मित्र होता. परंतु तो तिला मानसिक त्रास देत होता. त्यानेच तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं. देवराजच्या त्रासाला कंटाळून श्रावणीने हे पाऊल उचललं असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. 

Related Posts
1 of 1,359

 श्रावणी गेल्या आठ वर्षांपासून तेलुगू क्षेत्रात कार्यरत आहे. श्रावणीच्या हिट लीस्टमध्ये ‘मौनरागम’ आणि ‘मनसु ममता’ या मालिकांचा समावेश आहे. ‘मनसू ममता’ या मालिकेत ती काम करत होती. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: