आज होणारी जीएसटी परिषदेची बैठक

0 50

नवी दिल्ली – भारतातील बिगर-भाजपशासित राज्यांचे नुकसानभरपाईच्या प्रश्नावरून केंद्र सरकारशी मतभेद असल्याने आज होणारी जीएसटी (वस्तू आणि सेवा कर ) परिषदेची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षांतील महसुली तूट भरून काढण्यासाठी ९७ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा पर्याय सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धापर्यंत भाजपशासित अथवा जीएसटीच्या प्रश्नावर भाजपला पाठिंबा दिलेले पक्ष अशा २१ राज्यांनी मान्य केला.

परंतू पश्चिम बंगाल, पंजाब आणि केरळसारख्या विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांनी केंद्राचा कर्ज घेण्याचा पर्याय अद्यापही स्वीकारलेला नाही.

Related Posts
1 of 1,371

या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या बैठकीत विरोधी पक्षांचे सरकार असलेली राज्ये केंद्राच्या कर्ज घेण्याच्या पर्यायाला विरोध करतील आणि जीएसटी नुकसानभरपाई करण्यासाठी पर्यायी यंत्रणेची मागणी करतील अशी माहित सूत्रा कडून मिळत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: