आज सुध्दा रिया चक्रवर्तीला जामीन मिळाला नाही

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होत आहे . रिया चक्रवर्तीला ड्रग्स सेवन आणि अन्य आरोपांमुळे ८ सप्टेंबरला अटक करण्यात आली. त्यानंतर तिने जामिनासाठी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती.परंतु आज न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या साठी न्यायालयाने कोणतेही कारण न देता तिचा जामीन अर्ज फेटाळला . तिच्या शिवाय तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि इतर सहा आरोपीचा सुध्दा जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहे.
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे रिया आणि इतरांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे. शिवाय सत्र न्यायालयाने रियाचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे ती आता उच्च न्यायालयात धाव घेणार आहे,अशी बातमी मिळाली.
मंगळवारी रियाला अटक केली आणि त्याच दिवशी न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. यापूर्वी सुध्दा न्यायालयाने रियाला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर रियाने दुसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला.