DNA मराठी

अहमदनगर २५१८५ कोरोना बाधित 

0 80

६३८ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज –  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४४ टक्के – आज नव्या ८३ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३०४६ इतकी झाली आहे.

Related Posts
1 of 2,492


बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३२, संगमनेर ०१, राहाता ०१,  पाथर्डी ०२, नगर ग्रामीण ०१, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट ०१, नेवासा ०६, श्रीगोंदा ०३, पारनेर ०३, अकोले  १७, कोपरगाव ०१, जामखेड ०२, कर्जत ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ६३८ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २०५ संगमनेर ४२ राहाता ३२, पाथर्डी १२, नगर ग्रा.४२, श्रीरामपूर ४३, कॅंटोन्मेंट १०,  नेवासा ५३, श्रीगोंदा १९, पारनेर १२, अकोले १३, राहुरी २१, शेवगाव ३८,  कोपरगाव ५३, जामखेड ०८, कर्जत १५, मिलिटरी हॉस्पिटल १८ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या: २१७१०
उपचार सुरू असलेले रूग्ण:३०४६
मृत्यू: ३६९
एकूण रूग्ण संख्या:२५१८५

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: