
अहमदनगर – २७ सप्टेंबर २०२० रोजी राष्ट्रवादी पदवीधर संघ यांच्या वतीने राज्यव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा भासू नये असे उद्दिष्ट समोर ठेऊन महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने पूर्ण राज्यात एकच वेळी रक्तदान महाअभियान आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सुनील दादा पाटील उपाध्यक्ष शेषराज भोसले राष्ट्रवादी राज्य समनव्यक आदरणीय सुहास उभे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन करण्यात आले होते. तरी बहुतांश तरुणांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. राष्ट्रवादी भवन अहमदनगर राष्ट्रवादी भवन येथे राजेंद्र तात्या फाळके अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमदनगर, आमदार संग्राम जगताप ,प्रा माणिकराव विधाते सर शहर जिल्हाध्यक्ष, योगेश झेंडे पाटील राष्ट्रवादी पदवीधर संघ उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी १०३ जणांनी रक्तदान केले. तरी सर्व तालुक्यातील अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माणिकराव विधाते सर ,गजुभाऊ भांडवलकर दादासाहेब दरेकर यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष पदाच्या निवडी करण्यात आल्या या सर्व कार्यक्रमाचे आभार अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष शरद चोभे व उत्तर जिल्हाध्यक्ष विराज शिंदे जिल्हा उपाध्यक्ष लहुजी कासार यांनी केले.