अहमदनगर : महापालिकेच्या सेवा १४ दिवस बंद ठेवण्याचा कर्मचारी युनियनचा निर्णय…

0 70

महापालिका कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत चालला आहे, ही साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता महापालिकेची सर्व कार्यालये 14 दिवस बंद ठेवून कर्मचार्‍यांना ’वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगून त्यांची दैनंदिन हजेरी नोंदविण्यात यावी, अशी मागणी महापालिका कामगार युनियनने आयुक्त व महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मात्र आयुक्त निर्णय घेवो अगर न घेवो कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी युनियनच्यावतीने सोमवार (दि.10) पासून या निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचे युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले. याबाबत युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार व महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेवून निवेदन दिले. महापालिकेच्या सर्व प्रभागातील कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना बाधीत कर्मचार्‍यांची संख्या वाढत असल्याने महापालिकचे मुख्यालय व सर्व प्रभाग समिती कार्यालया अंतर्गतची अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये किमान 14 दिवस पूर्णतः बंद ठेवण्यात येऊन तेथील कर्मचार्‍यांकडून ’वर्क फ्रॉम होम’ या पध्दतीने महापालिकेतील कामकाज करून घेण्यात यावे व त्यांची दैनंदिन हजेरी नोंदविण्यात यावी. कोरोना आजाराने मृत्यूमुखी पडलेले महापालिकेतील 2 कर्मचारी यांच्या वारसांना महापालिका प्रशासन व आमचे संघटनेतील उभयपक्षी निर्णयाप्रमाणे सुरक्षा कवच विमा अंतर्गत रू.50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणेकामी सदर बाबतचा प्रस्ताच तातडीने शासनाकडे मंजुरीस्तव पाठविण्यात यावा. त्यांच्या वारसांना महापालिकेच्या कायम सेवेत सामावून घेण्यात यावे. मयत कर्मचारी यांची महापालिका सेवेतील भविष्य निर्वाह निधी उपदानाच्या रकमा, सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम व इतर सर्व कायदेशीर देणे तातडीने अदा करण्यात यावेत.

Related Posts
1 of 2,107
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: