अहमदनगर मध्ये कोरोना रुग्णाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी


अहमदनगर: राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अहमदनगरमध्येही कोरोना चे अनेक रुग्ण सापडले आहेत. सर्वसामान्यांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. एका रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आज तोफखाना पोलिसांनी दिली. अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवरील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधित रुग्णाने रुग्णालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या या रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.हा ३२ वर्षीय रुग्ण पाथर्डी तालुक्यातील आहे. त्याच्यावर अनेक दिवसांपासून स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्याला अहमदनगर शहरातील सुरभी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये उपचार सुरू होते. आज पहाटेच्या सुमारास त्याने खिडकीची काच फोडून खाली उडी मारली. खाली पडून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तोफखाना पोलिसांना घटेनची माहिती देण्यात आली असून, चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले