अहमदनगर – ती “लालपरी” आज पासून पुन्हा धावर,


अहमदनगर – कोरोना मुळे कधी न थांबणार जग थांबलं होत, या काळात लॉकडाऊनमुळे गेले सुमारे पाच महिने थांबलेली आणि राज्याच्या जीवनवाहिनी असलेली “लालपरी” ST आज पासून एसटीचा आंतरजिल्हा प्रवास आज पासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना ई-पास वाढण्याची गरज नाही. ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. गणपतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर त्यामुळे राज्यातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.
कधी न थांबणारी ग्रामीण भागातील जीवनदायीनी असलेली बस ( ST) कोरोना मुळे 23 मार्चपासून संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती.
मे महिन्या नंतर शेवटच्या आठवडय़ात रेड झोन’ वगळता
जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली होती.
गुरुवारपासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही,
शिवनेरी या सर्व प्रकारच्या बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याचे परब यांनी सांगितले या मुळे ग्रामनीं भागातील सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळणार आहे.