DNA मराठी

अहमदनगर जिल्हा 

0 332
अहमदनगर – मजलक अहमद याने इ.स.1494 मध्ये वसविलेले आणि  निजामशाहाचे राजधानीचे शहर पुढे त्याच्याच नावाने अहमदनगर शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. जिल्ह्याचे मुख्यालय अहमदनगर शहर असल्याने जिल्ह्याला अहमदनगर हे नांव देण्यात आले. पेशवाईच्या अस्तानंतर इ.स.1822 मध्ये अहमदनगर जिल्हयाची निर्मिती झाली त्यावेळी अहमदनगर जिल्हयाची हद्द आताच्या नाशिक जिल्हयातील वणी तर दुस-या टोकास साप्रंत सोलापूर जिल्हयातील करमाळयापर्यंत होती. 1869 मध्ये नाशिक व सोलापूर जिल्ह्याची निर्मिती झाल्याने वणी व करमाळा हे अहमदनगर जिल्हयातून वगळण्यात आले. पुणे महसूल विभागात असलेला अहमदनगर जिल्हा फेब्रुवारी 1981 पासून नाशिक या नवीन महसूल विभागात समाविष्ट्ट करण्यात आला.
Related Posts
1 of 4

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: