अहमदनगर जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणारे जिल्हा शिक्षक पुरस्कारांना गुरूवारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील १४ प्राथमिक शिक्षकांच्या पुरस्कारावर शिक्कामोहर्तब झाला आहे.
पुरस्कार जाहीर झालेल्यामध्ये अकोले स्मिता घनवटे जि.प. शाळा कळस बु, संगमनेर सुशिला धुमाळ जि.प. शाळा मिझापूर, कोपरगाव नवनाथ सुर्यवंशी जि.प. शाळा हरीसन ब्राँच, राहाता वैशाली सोनवणे जि.प. शाळा ममदापूर मराठी, श्रीरामपूर शोभा शेंडगे जि.प. शाळा फत्याबाद, राहुरी दत्तात्रय नरवडे जि.प. शाळा वांबोरी स्टेशन, नगर जयश्री घोलप जि.प. शाळा शिंदेवाडी, पारनेर मिनल शेळके जि.प. शाळा बगेवाडी, श्रीगोंदा शोभा कोकाटे जि.प. शाळा गोपाळवाडी, नेवासा रेवनाथ पवार जि.प. शाळा विधाते वस्ती, शेवगाव जयराम देवडे जि.प. शाळा चेडेचांदगाव, पाथर्डी बेग आरिफ युसूफ जि.प.शाळा नांदूर निबांदैत्य, कर्जत विजयकुमार राऊत जि.प. शाळा नागवलवाडी आणि जामखेड मुकूंदरात सातपुते जि.प. शाळा वाकी यांचा सामवेश आहे.