अहमदनगर जिल्हा बॅकेसाठी जगन्नाथ राळेभात यांचा भाजप पुरस्कृत उमेदवारी अर्ज दाखल

0 26

जामखेड – अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांनी जामखेड सेवा संस्था गटातून तर कर्जत येथून अंबादास पिसाळ यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या कडे दाखल केला आहे. हे दोन्ही उमेदवार भाजप पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार आहेत.

जिल्हा बॅक संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी मतदारसंघातील उमेदवारांचा उमेदवारी अर्ज एकाचवेळी भरण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार जामखेड येथून विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात व कर्जत येथील विद्यमान संचालक अंबादास पिसाळ यांना भाजप जिल्हा समितीने उमेदवारी जाहीर केली होती त्यानुसार दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

बॅंकेचे माजी संचालक पांडुरंग सोले पाटील, प्रा. अरूण वराट सर, सुधीर राळेभात, किसनराव ढवळे, दादाहरी थोरात, अंकुशराव ढवळे, तुषार पवार, अमृत पाटील, लहू शिंदे, पांडुरंग उबाळे, अंकुश शिंदे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दि. २० रोजी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी जाहीर केले होते की, मी जिल्हा बॅकेची निवडणूक लढविणार नाही तर मी पॅनल समितीमध्ये आहे. त्यामुळे आता जामखेड तालुक्यातुन भाजपाचे उमेदवार म्हणून जगन्नाथ राळेभात हे निश्चित झाले आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून राळेभात हे जामखेडचे जिल्हा बॅंकेत प्रतिनिधीत्व करत आहेत. विखे पाटील गटाचे ते एकनिष्ठ आहेत. फक्त पाच वर्षे खासदार सदाशिवराव लोखंडे हे संचालक होते.

Related Posts
1 of 1,290

जामखेड तालुक्यात एकुण ४७ मतदार आहेत. बहुसंख्य मतदार हे राळेभात बरोबर आहेत. आता तालुक्यात दुसर्‍या गटातर्फे कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे
आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: