अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर गुन्हा दाखल

0 71

पारनेर – भाजप नेते व अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर तहसीलदार यांचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तहसीलदारांकडे खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा आणणे या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे .पारनेर तहसील कार्यालयात भाजप नेते सुजित झावरे काही कार्यकर्त्यांसह कांदा निर्यातबंदी विरोधात निवेदन देण्यासाठी आले असताना बैठक सुरू असल्यामुळे तहसीलदार यांनी काही वेळ त्यांना थांबण्याचा निरोप दिला होता आणि यावरूनच यांच्यामध्ये खडाजंगी झाली.

Related Posts
1 of 2,047

 त्यानंतर देवरे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात जाऊन निरीक्षक गवळी यांच्या दालनात ठिय्या मांडून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली . सुजित झावरे ,सोन्याबापु भापकर यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तरीही तहसीलदार यांनी फिर्याद देण्यावर ठाम राहून फिर्याद दाखल केली.देवरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की फोनवरून अश्लील बोलून दर महिन्याला हजार रुपयांची मागणी केली होती तसेच पैसे न दिल्यास जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करू अशी धमकी दिली होती त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की मी दालनात काम करत असताना झावरे यांनी गैरकायद्याने जमाव जमवून दमदाटी, विनयभंग केला .तहसीलदारांकडे खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा आणणे असा गुन्हा भाजप नेते सुजित झावरे यांच्यावर दाखल झाला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: