अहमदनगर कोरोना अपडेट – ५२२ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज तर वाढले ६५० नवे रुग्ण.


अहमदनगर: जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ११,६४७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७८.०८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६५० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३,०७९ इतकी झाली आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या: ११६४७
उपचार सुरू असलेले रूग्ण:३०७९
मृत्यू :१९१
एकूण रूग्ण संख्या:१४९१७