अहमदनगरचं  ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणपतीची प्रतिष्ठापना संपन्न 

0 15

अहमदनगर : आज संपूर्ण देशात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून कोरोना संकटाला थोडं दूर ठेऊन आणि नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा होतोय . तीन हातांनी दर्शन देणारा आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा नगरची ग्रामदैवत विशाल गणपतीची प्रतिष्ठापना आज जिल्हा पोलीस प्रमुख  अखिलेश कुमार यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली . कोरोनामुळे गणेशभक्तांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार नसले तरी भक्तांचा हिरमोड होऊ नये यासाठी फेसबुक तसेच यूट्यूब ला लाईव्ह दर्शनाची सोया करण्यात अली आहे अशी माहिती विशाल गणपती मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अभय आगरकर यांनी दिली . या गणेशोत्सवामध्ये सर्वांनी घरातच राहून नियमांचे पालन करून कुटुंबियांसमवेत हा उत्सव साजरा करावा त्याचबरोबर सोशल डीस्टनसिंग आणि मास्कचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांनी केलंय .  

Related Posts
1 of 1,357
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: