अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रक १४ ब्रास वाळू पोलीसांकडून जप्त 

0 18

जामखेड – अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर जामखेड पोलीसांची धडक कारवाई करीत पंचेचाळीस लाख रुपयांची तीन वाहने व सत्तर हजार रुपयांची चौदा ब्रास वाळू जप्त करत तीनही चालकाविरुद्ध गौण खनिज अधिनियमन नुसार गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना रविवार पहाटे पाच वाजता गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की जामखेड अरणगाव रस्त्यावरून राजेंद्र नर्सरी जवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक येत आहेत त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला अरणगाव जवळील इस्सार पेट्रोल पंपाजवळून एक ट्रक जोराने येताना दिसली संशय आल्याने ट्रक क्रमांक एम एच १४ ए. एच. ६७६९ पाठलाग करून चौकशी केली असता ट्रक मध्ये चार ब्रास वाळू वीस हजार रुपयांची तर दहा लाख रुपयांची गाडी ताब्यात घेऊन ट्रक चालक रामहारी रमेश डोके रा. भुतवडा ता. जामखेड यास ताब्यात घेऊन गौण खनिज अधिनियमन कलम २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण पहा –    रेखा जरे हत्याकांड प्रकरणी संपूर्ण नगर जिल्हा गप्प का? 

तर दुसरा हायवा ट्रक एम एच १६ सीसी ५७६९ जामखेड रस्त्यावर पाटोदा शिवारात वाळूने भरलेला दिसला त्यामध्ये सहा ब्रास वाळू तीस हजार व गाडी किंमत २५ लाख व सहा ब्रास वाळू तीस हजार रुपये किमतीचे जप्त करून ट्रक चालक परमेश्वर पांडुरंग पठाडे रा. आष्टी जि. बीड यांच्या विरोधात गौण खनिज अधिनियमन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरा वाळू वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच १६ क्यु १०१२अरणगाव जामखेड रस्त्यावर एस्सार पेट्रोल पंपासमोर पोलीसांनी धरला त्या गाडीत चार ब्रास वाळू वीस हजार रुपये व गाडी किंमत दहा लाख रुपयांची जप्त केली ट्रक चालक अरविंद रघुनाथ पवार रा. शितपुर ता. कर्जत  यांच्या विरोधात भादवी ३७९ गौण खनिज अधिनियमन कलम २१ नुसार गुन्हा दाखल.

Related Posts
1 of 1,301

तिन्ही कारवाईत ४५ लाख रुपयांची दोन ट्रक व एक हायवा यात १४ ब्रास वाळू ७० हजार रुपये तिन्ही वाहने वाळू सह जप्त करत तिन्ही चालकाविरुद्ध जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर हेड पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी बोस, संजय लाटे, संग्राम जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे, आबा आवारे यांनी केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: