अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यावर दाखल होणार कलम 188 व 328…

0 32

अहमदनगर –  अवैधरीत्या गुटखा साठवणूक व विक्री करणाऱ्या वर कलम 188 व 328 नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊ नये असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला होता मात्र या आदेशाला सर्वोच न्यायालयाने स्थगिती दिली असून आता गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत.

 राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीनं ऑडीट करा – अजित पवार 

अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्या विरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यासंदर्भात चा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला असून लवकरच यासंदर्भात निर्णय होईल अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी संदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व 328 कलम लावण्यात येत होती परंतु काही गुटका व्यापाऱ्यांनी या संदर्भाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.

    हे पण वाचा – बाळ बोठे विरोधात स्टँडिंग वॉरंट. बाळ बोठेच्यात अडचणीत  

Related Posts
1 of 1,301

न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला होता , या निकालाच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनान विभागाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती 7 जानेवारी 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सरकारची बाजू ऐकून घेत औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे त्यामुळे आता राज्यांमध्ये अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 188 सोबतच कलम 328 लावला जाणार आहे त्यामुळे अवैधरीत्या गुटखा विक्री करणा-यांची मुस्के आवळे जाणार आहे सोबतच राज्यात गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मोका कायद्याअंतर्गत देखील कारवाई करण्यात संदर्भात प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.

             डोनाल्ड ट्रम्प यांचा ट्विटर अकाउंट कायमस्वरूपी बंद ट्विटरने घेतला निर्णय 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: