अर्थव्यवस्थेसमोरील संकटे अजून कायम आहे – निर्मलासीतारामन

0 165

नवी दिल्ली –   मागील सहा महिन्यांपासून  देशात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एप्रिल ते जून तिमाहीत देशाचे राष्ट्रीय सकल उत्पन्नात मध्ये भारतीय अर्थव्यवस्थे मधील सर्वात मोठी घसरण झाली ती घसरण २३.९ टक्क्यांची  झाली असताना  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेसमोरील संकटे अजून कायम असल्याचे म्हटले आहे. 


अर्थव्यवस्थेसमोर सध्या अनेक आव्हाने आहेत. करोनाचे संकट कधी संपणार, खास करुन जोपर्यंत करोनावर लस सापडत नाही तोपर्यंत याबद्दल कोणीही ठोसपणे काही सांगू शकत नाही, असं निर्मलासीतारामन  यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले मागील सहा महिन्यांमध्ये अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने कमी न होता अधिक वाढली आहेत. अर्थ मंत्रालय सध्या कोणत्याही समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी निर्णय घेत आहे आणि त्याची अंमलबजावणी करत आहे असंही सांगितलं.

Related Posts
1 of 2,047

भारतामधील करोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी देशातील मृत्यूदर वाढलेला नाही असंही निर्मलासीतारामन यांनी  सांगितलं. मात्र असं असलं तरी करोना हा सध्या मोठा चिंतेचा विषय असल्याचेही निर्मलासीतारामन यांनी म्हंटले आहे . करोनाबाबत बोलताना निर्मलासीतारामन म्हणले  करोनावर पूर्णपणे परिणाम करणारे कोणतेच औषध सध्या उपलब्ध नाही . हे संकट कधी टळेल याचीही कोणती ठोस तारीख आपल्याला ठाऊक नाही. अनेक ठिकाणी लोकं यावर उपचार घेऊन परत येत आहेत. मात्र लहान उद्योगजक आणि मध्यम स्तरावरील उद्योजकांमध्ये सध्याच्या परिस्थितीसंदर्भात अनिश्चितता कायम आहे .

भारतामधील करोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी देशातील मृत्यूदर वाढलेला नाही असंही  निर्मलासीतारामन  यांनी  सांगितलं. मात्र असं असलं तरी करोना हा सध्या मोठा चिंतेचा विषय असल्याचेही निर्मलासीतारामन यांनी नमूद केलं. करोनाबाधितांची संख्या, मृत्यूदर नियंत्रणात राहण्याबरोबरच जनजागृती हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: