अर्थव्यवस्थेवरून रोहित पवार यांची केंद्र सरकारवर टीका

0 162

कर्जत – करोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन प्रभाव असणार आहे. त्यामुळे अर्थव्यस्थेला पुर्नजीवत करण्यासाठी शाश्वत सक्रिय धोरण आखण्याची गरज आहे. दुर्दैवानं केंद्र सरकार याला प्रतिसाद देताना केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिंद्रे बुजवतानाच दिसत आहे. यात अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे असं रोहित पवार यांनी ट्विट करून केंद्र सरकार वर टीका केली आहे.   

भारतात निर्माण झालेल्या कोरोनाला संपवण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. हे प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउनचा निर्णय घेतला या निर्णय मुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसला. अनेक नवीन आर्थिक समस्या करोनामुळे आज निर्माण झाल्या असून सरकारने आता काही सक्रिय धोरण स्वीकारण्याची गरज आहे असे मत कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी  एक ट्विट करून म्हटलं आहे.

Related Posts
1 of 2,057

करोनाचा प्रचंड आर्थिक फटका आज बसला आहे या मधून बाहेर पडण्यासाठी  सरकारनं पावलं उचलण्याची गरज आहे असे सुध्दा ते म्हणाले. रोहित पवार यांनी करोनाचे दीर्घ आर्थिक परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त करतानाच केंद्रानं परिणामकारण धोरण आखण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.करोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे देशाचा जीडीपीही आक्रसला असून, अनेक उद्योगांना घरघर लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात बेरोजगारीचा प्रश्न वेगानं पुढे येताना दिसत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: