DNA मराठी

अर्थव्यवस्थेत इतिहासातील सर्वात मोठी घसरण

2 244

नवी दिल्ली- कोरोना मुळे देशात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका देशातील अर्थव्यवस्थेला बसला अाहे.देशाच्या इतिहाातील सर्वात मोठी घसरण अर्थव्यवस्थेत झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था तब्बल २३.९ टक्याने घसरण झाली आहे. अर्थव्यवस्थेतील फक्त कृषी क्षेत्र वळगता इतर क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे.

मार्च महिन्यापासून देशाची अर्व्यवस्था पूर्ण पणे ठप्प झाली आहे याचा फटका देशाची (GDP) देशांतर्गत उत्पादन शुल्क कमी होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला बसले असे मत अर्थज्ज्ञांनी केले होते.

Related Posts
1 of 2,489

मागच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था पाहिल्या तिमाहीत एकूण देशांर्गत उत्पादन ३५.३५ लाख कोटी रुपये होते. या वर्षी पहिल्या तिमाहीत देशाचा ऐकून उत्पन्न २६.९० लाख कोटी रुपये एेवढे राहिले आहे. म्हणजेच तब्बल २३.९ टक्याची घसरण भारतीय अर्थव्यवस्थेत झाली आहे.

वरील आकडेवारी भारतीय सांख्यिकी विभागाने जाहीर केली अाहे. ही आकडेवारी सामोर येतातच राहुल गांधी सह अन्ये विरोधी पक्षाने सरकार वर हल्ला चढवला आहे.ही घसरण जगातील प्रमुख देशाच्या तुलनेत सर्वात मोठी घसरण अाहे. या आधी ब्रिटेनच्या अर्थव्यवस्था मध्ये २०.९ टक्क्याची घसरण झाली होती.

राहुल गांधीने केलेली सरकरवर टीका हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते आपली प्रतिक्रिया द्या

Show Comments (2)
error: Content is protected !!
%d bloggers like this: