अर्थव्यवस्थाला उपचाराची गरज – डॉ. रघुराम राजन

नवी दिल्ली – देशाचा जीडीपीला २३.९ टक्के घसरणे होणे ही अर्थव्यव्सथेसाठी धोक्याची बाब आहे. त्यामुळे आता तरी सरकारने आणि प्रशासनाने झोपेतून जागे होऊन अर्थव्यव्सथासावरणयासाठी काही प्रयत्न करावे असे स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी आपल्या लेखातून व्यक्त केले आहे. लिंक्डइन या समाजमाध्यमावर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी आपले हे मत व्यक्त केले आहे.
ते आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, सध्याच्या परिस्थितीत सरकारने आतापर्यंत जे काही केले आहे, त्याबाबत आत्मसंतुष्ट राहून चालणार नाही. त्याऐवजी यावर उपाय योजण्यासाठी जलद हालचाल करण्याची गरज आहे. भारताचा जीडीपी २३.९ टक्के आक्रसणे याची तुलना इटलीच्या जीडीपीची झालेली १२.४ टक्के घसरण तर अमेरिकेच्या जीडीपीचे ९.५ टक्क्यांनी आक्रसणे यांच्याशी होणार आहे. यामुळे आता खरे म्हणजे प्रशासनाने स्वतःच्या कार्यपद्धतीवर भयभीत होण्याची गरज असल्याचे राजन यांनी लिहिले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती ही एका रुग्णाप्रमाणे असून या रुग्णाला स्थायी स्वरूपातील उपचारांची गरज आहे. दिलासा पॅकेज आता पर्यंत मिळाला नाही. त्याला रुग्णशय्या दिल्यास तो नैराश्याने आणखी आजारी पडण्याची शक्यता आहे.
अर्थव्यवस्थेवर इलाज करण्यात उशीर झाल्यास अनेक कुटुंबांना एकवेळचे जेवणही मिळणार नाही, अनेकांना आपल्या पाल्यांना शालांतून काढावे लागेल आणि कामाला किंवा भीक मागण्यासाठी पाठवावे लागेल. घरात साठवलेले सोने गहाण ठेवून कर्ज काढण्याची वेळ अनेक कुटुंबांवर येऊ शकते. अनेकांचे कर्जांचे हप्ते आणि जागेचे भाडे थकलेले राहील.अशा भयानक इशारा डॉ. रघुराम राजन यांनी आपल्या लेखातून दिला आहे.