अरणगाव येथील घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

0 48

जामखेड – तालुक्यातील आरणगाव येथील गदादे वस्तीवर तीन अज्ञात चोरटय़ांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी करून १ लाख ३६ हजार रुपयांचा सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला. याबाबत तीन अज्ञात चोरयांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी लक्ष्मण महादेव अवसरे हे कवडगाव रोडवरील गदादे वस्तीवरील आपल्या रहात्या घरात दि ८ रोजी रात्री झोपले असतांना मध्यरात्री २ वाजेच्या सूमारास तीन अज्ञात चोरटय़ांनी फिर्यादीच्या घराच्या किचन चा दरवाजा तोडुन आत प्रवेश केला. या नंतर घरातील लोखंडी कपाट तोडून त्यातील रोख रक्कम पंधरा हजार, दोन मोबाईल व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण एक लाख छत्तीस हजार रूपयांचा मूद्देमाल चोरून नेला.
याच दरम्यान घरातील उचकापाचकीचा आवाज आल्याने घरातील झोपलेले लोक जागे झाले. मात्र तोपर्यंत चोरटे पळून गेले असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पो.कॉ शिवाजी भोस यांनी भेट दिली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ शिवाजी भोस हे करत आहेत.

Related Posts
1 of 1,371
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: