अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण निधी अभियानाला श्रीगोंदा तालुक्यात सुरुवात

0 27

 श्रीगोंदा –  अयोध्या मध्ये उभे राहत असलेल्या भव्य राम मंदिराच्या उभारणी साठी रामभक्त श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन समर्पण निधी साठी घरोघर संपर्क अभियान करणार असून या अभियानाची सुरुवात  १५ जानेवारी पासून श्रीगोंदा तालुक्यात करण्यात आली. शहरासह प्रमुख गावात पहिल्याच दिवशी अभियान सुरू करण्यात आले .यात टाकळी लोणार ग्रामस्थांनी अकरा हजार पाचशे एक्कावन रुपये देऊन अभियान सुरू केले. हे अभियान ३१जानेवारी पर्यंत  असल्याची माहिती   विश्व हिंदू परिषदे पश्चिम महाराष्ट्र  प्रांताचे सेवा प्रमुख दादाराम ढवाण यांनी दिली.

भानगावात मृतावस्थेत सापडलेला कावळा पॉझिटिव्ह………..

Related Posts
1 of 1,292
 राम मंदिर ते राष्ट्र मंदिरश्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र श्रद्धानिधी समर्पण अभियानाची सुरुवात श्रीगोंदा शहर ,बेलवंडी ,टाकळी लोणार ,कोळगाव ,पारगाव आदी गावात करण्यात आली. टाकळी लोणार येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना विश्व हिंदू परिषदेचे दादाराम ढवाण यांनी याबाबत माहिती दिली.अयोध्येमधील उभे राहत असलेल्या भव्य राम मंदिराच्या उभारणीत सर्व समाजाचा खारीचा वाटा असावा यासाठी किमान दहा रुपये पासून पुढे किती ही निधी देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या आवाहनाला प्रतिसाद देत टाकळी लोणार ग्रामस्थांनी सुरुवातीला अकरा हजार पाचशे एकावन्न रुपये दिले.
तर शहरातील कार्यक्रमात देवेंद्र जोशी यांनी त्यांच्या आईच्या स्मृती निमित्ताने पंधरा हजार रुपये दिले. यावेळी  हभप भूषण महाराज महापुरुष यांच्या हस्ते राम प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  अयोध्या मध्ये उभे राहत असलेल्या भव्य राम मंदिराच्या उभारणी साठी रामभक्त श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन समर्पण निधी साठी घरोघर संपर्क अभियान १५ जानेवारी ते ३१जानेवारी या काळात राबवणार असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदे पश्चिम महाराष्ट्र  प्रांताचे सेवा प्रमुख दादाराम ढवाण यांनी केले आहे. अभियान प्रमुख म्हणून संदीप घोडेकर ,अरविंद कासार ,अमोल हिरणवाळे,दत्तात्रय जगताप ,कालिदास कोथिंबीरे ,संदीप चौधरी  आदी काम करत आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: