अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली कॉलर ट्यून होणार बंद मात्र………………

0 35
 नवी दिल्ली –  मागच्या काही महिन्यापासून जर एखाद्या व्यक्तीला आपल्याला कॉल करायच्या असलातर आपल्या सर्वात आधी बिग बी म्हणजे अमिताभ बच्चनची आवाज ऐकावी लागत होती. मात्र आज पासून अमिताभ बच्चनची कॉलर ट्यून ऐकू येणार नाही कारण कि अमिताभ बच्चनची आवाजाची कॉलर ट्यून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अमिताभ बच्चनच्या आवाज जागी दुसरी कॉलर ट्यून येणार आहे.
देशात करोना लसीकरणाला सुरूवात १६ जानेवारी पासून होत असल्याने आता बच्चन यांच्या आवाजातील जुनी कॉलर ट्यून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे १५ जानेवारी शुक्रवार पासून मोबाइलची डिफॉल्ट कॉलर ट्यून बदलणार आहे. देशात करोना लसीकरणाला सुरू होणार असून नवीन कॉलर ट्यून लसीकरणाबाबत जनजागृती करणारी असेल.
Related Posts
1 of 1,292
नवीन कॉलर ट्यून महिलेच्या आवाजात असेल आणि ‘नवं वर्ष लसीच्या रुपात नवी आशा घेऊन आलं आहे’ अशाप्रकारचा संदेश या ट्यूनमधून दिला जाईल. शिवाय भारतीय लसीवर विश्वास ठेवा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असा संदेशही जनतेला नवीन कॉलर ट्यूनद्वारे दिला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: