अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापका गळफास घेऊन आत्महत्त्याचा प्रयत्न

0 31

यवतमाळ – यवतमाळ येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील  सहाय्यक प्राध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे.

कल्याण – विशाखापट्टणमराष्ट्रीय महामार्गावर  अपघात तीन जण जागीच ठार

मोहम्मद वसीम हे जगदंबा अभियांत्रिकी महाविध्यालात रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. काल सुटीच्या दिवशी ते महाविध्यालायत आले होते. त्यांनी आपले नियमित काम सुद्धा केले. मात्र  दुपारी वैक्तिक काम आल्यामुळे ते दुपारच्या सत्रात महाविद्यालयात येऊ शकले नाही.  त्या बाबत त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला तशी माहिती दिली, तरी सुद्धा प्राचार्यांनी त्यांना  कारणे दाखवा नोटीस दिली.

   हे पण पहा – रेखा जरे हत्यांकांड | बाळ बोठेच्या अडचणीत वाढ

Related Posts
1 of 1,301

त्यामुळे वैतागलेल्या प्राध्यापक वसीम यांनी आज महाविद्यालयाच्या एका वर्ग खोलीत दोरीच्या  सहाययने फाशी घेऊन आत्महत्त्याचा प्रयत्न केला आणि फाशी घेत असल्याचा व्हीडिओ काढून महाविद्यालयाच्या ग्रुप वर टाकला त्यामुळे महाविद्यालयाच्या प्राध्यापक मध्ये खळबळ उडाली आणि महाविद्यालयात उपस्थित असलेल्यांनी घटना स्थळाकडे धाव घेतली आणि प्रा. मोहम्मद वसीम यांना खाली उतरविले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. महाविद्यालयाचे  प्राचार्य आणि सचिव हे मानसिक त्रास देत होते त्यामुळेच आत्महत्येचा प्रयत्न केला असा आरोप प्रा. वसीम यांनी केला.  या घटनेची माहिती प्राध्यापक वसीम यांच्या नातेवाईकांना माहीत होताच ते देखील महाविद्यालयात पोहचले. आता या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली नेमकी कोणावर कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रक १४ ब्रास वाळू पोलीसांकडून जप्त 

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: