अभिनेत्री रकुल प्रीत सिंह एनसीबी समोर हजर…!

मुंबई – सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातून समोर आलेल्या बॉलिवूड मधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात रोज नव्या नव्या नाव समोर येत आहे याच नवा मध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंह याच्या सुध्दा नाव समोर आला होता या मुळे रुकुल प्रीत सिंह याला एनसीबी ने समन्स बजावून त्याला हजर राहण्याचे आदेश दिले होते.
म्हणून आज एनसीबीसमोर ती हजर होणार आहे. एससीबीकडून आज तिची चौकशी केली जाणार आहे. सुरुवातीला तिने समन्स मिळालाच नसल्याचा बहाणा देत टाळाटाळ केली. त्यानंतर तिने अखेर एनसीबीचे समन्स स्वीकारले आणि आज तिची चौकशीही केली जाणार आहे. आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणची उद्या चौकशी होणार आहे.
फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटासह सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांना २४ सप्टेंबरला एनसीबीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यापैकी सिमॉन खंबाटा त्याच दिवशी एनसीबी कार्यालयात दाखल झाली असून एनसीबीकडून तिची चौकशी करण्यात आली. तर आज रकुल प्रीत सिंहची चौकशी होत आहे.