अभिनेत्री पूनम पांडेला मारहाण : पोलिसांनी पतीला केली अटक !

पूनम पांडे एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र काही दिवसांपासून ती चर्चेत आहे तिच्या लग्नामुळे .काही दिवसांपूर्वीच तिने बॉर्यफ्रेंड सॅम बॉम्बे सोबत लग्न केले. लग्नानंतर तिने हनिमूनला जाण्यापूर्वीचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते.सगळं काही सुरळीत असताना आता एक धक्कादायक खुलासा तिने केला आहे.
पूनम पांडेने पतीवर माहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे . इतकंच नाही तर पोलिसांनी तिच्या पतीला अटकदेखील केली आहे .पूनम पांडेने पतीविरोधात छेडथाड, जीवे मारण्याची धमकी व मारहाण केल्याची तक्रार दाखल केली , त्यानंतर पोलिसांनी सॅम बॉम्बेला गोव्यातून अटक केली.
माहितीनुसार , ही घटना गोव्यातील कैराकोना गावात घडली. त्या गावात पूनम पांडे चित्रपटाचे शूटिंग करीत होती