अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण !

देशभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे ९० हजारांहून जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे.दोन दिवसांपूर्वीच आई माझी काळूबाई सेटवरील तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाली .या मालिकेतील एका जेष्ठ अभिनेत्रीचा कोरोनामुळे मृत्यूदेखील झाला. झाल्या प्रकारामुळे मालिकांचे शूटिंग जीवघेणे ठरत असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच आता अग्गबाई सासुबाई मालिकेतील फेमस अभिनेत्री निवेदिता सराफ याना कोरोनाची लागण झाली आहे .
निवेदिता सराफ अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत आसावरीची भूमिका साकारतात . निवेदिता यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे आणि मालिकेची शूटिंग थांबवण्यात आले आहे. सध्या निवेदिता सराफ यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत त्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे.
या प्रकारानंतर अग्गंबाई सासूबाई मालिकेत काम करणाऱ्या तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक यांची चाचणी करण्यात आली . सुदैवाने बाकी सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत .कलाकारांच्या सुरक्षेची योग्यरित्या काळजी घेतली जात असल्याचं मालिकेच्या टीमकडून सांगण्यात आले आहे.