अभिनेत्री काजल अग्रवाल करणार लग्न

0 13

मुंबई- दक्षिण चित्रपटांमधील लोकप्रिय असलेली अभिनेत्री काजल अगरवाल याने आज सोशल मीडियाद्वारे आपण लग्न करत आहे त्याची घोषणा केली आहे.


अभिनेत्री काजल अग्रवाल व्यावसायिक गौतम किचलूशी ती लग्नगाठ बांधणार आहे. मागच्या काही दिवसांपासून या दोघांची लग्नाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होती. लग्नाच्या जोरदार चर्चा होत होती .

आज अखेर सोशल मीडियावर पोस्ट लिहित काजलने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ती म्हणाली “मी हो म्हणाले मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की मी ३० ऑक्टोबर २०२० रोजी गौतम किचलूशी लग्नगाठ बांधत आहे. मुंबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. आयुष्याचा हा नवीन प्रवास एकत्र सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

Related Posts
1 of 67

तुमचं प्रेम आणि तुमच्या आशीर्वादासाठी खूप धन्यवाद” असं काजलने लिहिलं.अभिनेत्री काजल अग्रवाल लग्नानंतर सुद्धा मनोरंजनसृष्टीत काम करत राहणार असल्याचं तिने त्याच्या पोस्ट मध्ये स्पष्ट केलं आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: