अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, मी त्यांना ओळखत नाही – रिया


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय कडे द्यायचे कि नाही याबाबत कोर्टात केस सुरु आहे मात्र राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, त्यात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रिया चक्रवर्तीने मी “आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही आणि त्यांना कधीही भेटलेले पण नाही,” असं रिया चक्रवर्तीने म्हटलं आहे. त्यातच सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केल्यामुळे राजकारण तापलं आहे.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून महारष्ट्र सरकार आणि बिहार सरकार आमने सामने आले होते, या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करायचा की सीबीआयने यासंदर्भातील दाखल याचिकेवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी होणार आहे, दरम्यान विरोधी पक्षाच्या वकिलांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं आहे. विरोधकांकडूनही सातत्याने आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट करत आहे. यावरुन स्वत: आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिकाही मांडली होती. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरेंचा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं होतं.
त्यावर आता रियानेच आदित्य ठाकरे यांना ओळखत नसल्याचं सांगितलं. ती म्हणाली की, “मी आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही. त्यांना कधीही भेटले नाही. असे रियाने म्हट्ले आहे.