अनिल अंबानींवर पत्नीचे दागिने विकण्याची वेळ !

अनिल अंबानी हे नाव नेहमी आपण श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिले असावे. ते एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारूपास होते. मात्र आता अनिल अंबानी यांची परिस्थिती हलाखीची आहे,त्यांनी स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला. न्यायालयीन खटले लढण्यासाठी आपल्याला पत्नीचे दागिने विकावे लागल्याची कबुली त्यांनी लंडनमधील न्यायालयामध्ये दिली आहे.
त्यांची ही परिस्थिती करोडपती ते रोडपती झाल्याचे दाखवत आहे .भारतीय हवाई दलात दाखल झालेल्या राफेल विमानांच्या कंत्राटात अनिल अंबानी यांच्या कंपनीचा सहभाग होता मात्र तरीही त्यांची परिस्थिती खालावत गेली आहे.
माहितीनुसार ,अनिल अंबानी यांनी चीनमधील तीन ४ हजार ७६० कोटीचे बँकांकडून कर्ज घेतले आहे त्या वसुलीसाठी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे.त्यावेळी अनिल अंबानींनी खुलासा केला की ,मी एक सामान्य जीवन जगत आहे,पूर्वीसारखे माझे आयुष्य सुखी नाही. मी न्यायालयीन खटल्यांचा खर्च पत्नीचे दागिने विकून भागवला आहे.