अनलॉक ४ : आजपासून ‘या’ गोष्टींवर नसणार बंधने , जाणून घ्या…

0 45

आपल्या भारत देशात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होताना दिसत आहे. कोरोनामहामारीमुळे आर्थिक संकट देखील ओढवले आहे , त्यामुळे टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याचा निर्णय सरकारने घेतला .आज अनलॉक ४ ला सुरुवात होत आहे, जाणून घेऊया अनलॉक ४ मध्ये कोणत्या गोष्टींवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत,त्यामुळे जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात होणार आहे.

अनलॉक ४ मध्ये सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली होती. त्यामुळे आजपासून सर्व नियमांचे पालन करत हे समारंभ आयोजित करता येणार आहेत.मात्र नियमावलीप्रमाणे या समारंभांना फक्त १०० लोकंच उपस्थित राहु शकणार आहे.

अनलॉक ४ मध्ये शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार आहेत . बंदी असतानादेखील ९वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत जाण्याची परवानगी दिली गेली आहे. मात्र यासाठी पालकांची लेखी परवानगी आवश्यक आहे .त्याबरोबरच ५० टक्के शिक्षक -कर्मचारी वर्गालादेखील आजपासून शाळा-महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहावं लागणार आहे .तसेच आजपासून शैक्षणिक कार्यक्रमदेखील सुरू करण्यास परवानगी आहे .

Related Posts
1 of 1,358

कोरोना महामारीचे संकट असतानादेखील सरकारच्या अनलॉकच्या धोरणामुळे जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे . मात्र सर्व नियमांचे पालन करत जनजीवन सुरळीत करण्याची गरज आहे कारण कोरोनावर अजूनही लस मिळाली नाही .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: