अजित पवार साहेब भाषा नीट करा तुमची नाहीतर…….. – निलेश राणे

0 39
मुंबई –  राज्याचे  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर यांच्यावर रेणू शर्माने लावलेल्या बलात्काराच्या आरोपावरून  भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेते किरीट सोमैया असो किंवा नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे असो हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहे. याच पार्श्वभूमीवर काल निलेश राणे यांनी एक ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जहरी टीका केली होती आणि आयपीएस विश्वास नागरे पाटील यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
त्यांनी आपल्या दोन ट्विट करत म्हणाले होते कि काय चाललंय महाराष्ट्रात??? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी?? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशांनी पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं.
तर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते कि मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंट मुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत.
Related Posts
1 of 1,321

                      शरद पवारांनी घेतला धनंजय मुंडे यांच्याबाबत हा निर्णय………

या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी पुणे येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना उत्तर दिला होता आणि सांगितले कि निलेश राणे वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.  अश्या शब्दात त्यांनी निलेश राणेला उत्तर दिले होते.

त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे – अजित पवार 

आता अजित पवार यांचा उत्तरला प्रतिउत्तर देत निलेश राणे यांनी एक ट्विट करून अजित पवार यांना आपली भाषा नीट करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे कि फार कमी नेते आहेत महाराष्ट्र मध्ये ज्यांना अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल. अजित पवार साहेब भाषा नीट करा तुमची नाहीतर हाच निलेश राणे एक दिवस तुमची घमेंड उतरल्याशिवाय राहणार नाही. असा ट्विट करत त्यांनी अजित पवारयांना उत्तर दिला आहे. आता अजित पवार यांच्या कडून या टीकेला काय उत्तर येतो हे पाहावे लागणार आहे.   
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: